सिंधुदुर्गनगरी.ता,१४: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंबा व्यापार संकटात सापडला होता. लॉकडाऊनमुळे वाहतुक बंद झाली होती. त्यामुळे हक्काच्या मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आंबा कसा पाठवायचा याचा प्रश्न आंबा उत्पादकांसमोर होता. यावर जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या सूचनांनुसार आंबा वाहतुकीस कृषि विभागातर्फे परवानगी देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कृषि विभागाने आंबा वाहतुकीसाठी परवाने देण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना झाला. त्यामुळे वाशी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती व मुंबई येथे घरपोच विक्रीसाठी आंबा पाठविणे उत्पादकांना शक्य झाले. या माध्यमातून आतापर्यंत 1 हजार 590 टन आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. तर एकूण 1 हजार 130 वाहनांमधून 88 हजार 362 पेट्या विक्रीसाठी गेल्या आहेत. त्याशिवाय स्वतः शेतकरी व शेतकरी समुहामार्फत स्थानिक व जिल्ह्या बाहेरील बाजारपेठेमध्ये सुमारे 5 हजार टन आंब्याची विक्री करण्यात आली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बागल यांनी सांगितले.
कृषि विभागाच्या सहाय्याने १५९० टन आंब्याची विक्री…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES