सिंधुदुर्गनगरी.ता,१४: कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासकीय मालवण तंत्रनिकेतनचे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम अध्यापन वर्ग सुरू आहेत.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण विभाग व संचालक मंडळाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार कोरोना संसर्ग रोगाचा बचाव सूचनेनुसार गेले काही दिवसांपासून जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, मालवण मधील कार्यालयीन व अध्यापनाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व संस्थेतील अध्यापकांनी घरीच राहून ऑनलाईन पध्दतीने व्हॉटसअॅप, गूगल ड्राईव, झूम मीटिंग, यु-ट्यूब इ. च्या माध्यमातून राहिलेले अध्यापनाचे कामकाज पूर्ण करावे असे सुचवले होते. त्यासाठी संस्थेतील प्रत्येक शाखेतील वर्गाचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. संस्थेतील प्राध्यापक वर्ग स्वतः व्हिडियो लेक्चर तयार करून ते यू-ट्यूब , गूगल ड्राईव, व्हॉटसअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचे व्हिडियो लेक्चर विद्यार्थ्यांना पाठवले जात आहेत. तसेच प्रात्यक्षिके पूर्ण करण्याकरिता इंटरनेट वर मोफत उपलब्ध असलेल्या सिम्युलेशन सॉफ्टवेयर चा वापर करण्यात येत आहे. या चालू असलेल्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे वेळोवेळी घेत आहेत.
संपूर्ण देश लॉकडाउन स्थितीमध्ये असताना सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्राध्यापक वर्ग अगदी प्रामाणिकपणे “वर्क फ्रॉम होम” च्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावत आहेत.
मालवण तंत्रनिकेतनचे “वर्क फ्रॉम होम” अध्यापन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES