वैभववाडी.ता,१४: वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.तर तालुक्यात प्रत्येक गावात घरोघरी जयंती साजरी करण्यात आली.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वञ लाॕक डाऊन आहे.या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाने बौध्द बांधवांनी सार्वजनिक स्वरुपात न करता घरोघरी जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते.तालुक्यातील बौध्द बांधवांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथमच अशा प्रकारे घरोघरी जयंती साजरी केली.प्रत्येक घरात सकाळी भगवान गौतम बुध्द व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मांडणी करुन पूजन करण्यात आले. ञिसरण पंचशिल घेऊन डाॕ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
तर वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने दरवर्षी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.माञ यावर्षी संघटनेच्या मोजक्या पदाधिकारी यांनी वैभववाडी येथील स्मारकामध्ये महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन ञिसरण पंचशिल घेऊन अभिवादन केले.
चौकट-
संघटनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता राञंदिवस सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी तसेच पञकारांना मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सरचिटणीस रविंद्र पवार, उपाध्यक्ष संतोष कदम, सहचिटणीस शरद कांबळे ,बौध्द उपासक महेंद्र यादव आदी मोजके पदाधिकारी उपस्थित होते.