Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्ह्यात २९४९ मे.टन मोफत धान्याचे वितरण...

जिल्ह्यात २९४९ मे.टन मोफत धान्याचे वितरण…

सिंधुदुर्गनगरी.ता,१४: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 हजार 949 मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 418 रास्त भाव धान्य दुकांनांमधून हे वितरण करण्यात आले आहे. तर 432 धान्य दुकानांमधून 3 हजार 469 मे.टन नियमीत धान्याचे वाटप करण्यात आले आहे. कुडाळ येथील गोदामातून माहे मे साठीच्या नियमित धान्याची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मे महिन्यामध्येही नियमीत व मोफत असे दोन्ही धान्याची वाटप सुरळीत राहील.
जिल्ह्यात 10 ठिकाणी शिवभोजन केंद्रांची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 750 थाळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवभोजन केंद्र व उपलब्ध थाळींची संख्या पुढील प्रमाणे आहे. जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे दोन बचत गटांकडे मिळून 150 थाळी, सावंतवाडी येथील विघ्नेश हॉटेल येथे 100 थाळी, कुडाळ येथे संकल्प स्वयंसहाय्यता समुह 50, स्वाधार लोकसंचालित साधन केंद्र 50, हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, कणकवली 100, श्री स्वयंसहाय्यता महिला बचकत गट, मालवण 100, हॉटेल संडे कॉर्नर ॲॅँड कॅटरर्स, वेंगुर्ले 50, गुरू माऊली भोजनालय देवगड 50, तनया घरगुती खानावळ, वैभववाडी 50, चैतन्य प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग – 50 या प्रमाणे एकूण 750 थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार तसेच बेघरांसाठी 9 कॅम्प उभारण्यात आले असून त्याठिकाणी 187 व्यक्तींच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आबोली येथे 18, शेर्ले येथे 21, इन्सुली टोल नाका येथे 24, आंबोली पब्लिक स्कूल येथे 28, पडतेवाडी येथे 29, भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे 22, खारेपाटण येथे 21, बोर्डवे येथे 17, वैभववाडी येथे 7 या प्रमाणे व्यक्तींनी आसरा घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments