सावंतवाडी.ता,१५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला.महसूल अधीकाऱ्यांनी देखील गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी खबरदारी घेतली त्यांना मदतीचा हातभार माजी आमदार शिवराम दळवी यांनीही लावला.
आंबोली या ठिकाणी दोन तर बांदा,शेले येथे परप्रांतीय कामगारांना शासनाने निवारा केंद्र सुरू केले आहे.तसेच अनेक कामगार तालुक्यातील विविध ठिकाणी थांबून आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कामगार गावी जाऊ शकत नाहीत त्यामुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,तहसीलदार राजाराम म्हात्रे,नराध्यक्ष संजू परब आणि समाजातील मान्यवर तहसीलदार राजाराम म्हात्रे व महसुल मंडळ अधिकारी,तलाठी यांच्याकडे माजी आमदार शिवराम दळवी यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी शिवराम दळवी यांनी दुकानदार सुचवीला,तेथुन सुमारे पंचवीस हजार रुपयांपर्यंत रेशन,जीवनावश्यक वस्तू खरेदी करून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी वाटप केले तसेच आंबोली येथील केंद्रावर असणाऱ्या कामगारांना भोजनाची व्यवस्था केली.