वेंगुर्ले .ता.१५: तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत मार्फत कोरोना विषाणू प्रतिबंध होण्यासाठी गावातील सर्व कुटुंबांना मास्क ,डेटॉल साबण यांचे वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ ग्रा.प.सरपंचा समिधा कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी मधुकर घाडी, उपसरपंच प्राजक्ता मुंडये, ग्रा.प. सदस्य विष्णू कोंडसकर, छाया गावडे, लीलाधर मांजरेकर, घनश्याम नाईक, संतोष कासले व सर्व ग्रा.प.सदस्य, ग्रा.प. कर्मचारी मधुसूदन माळकर, रामचंद्र धरणे, संतोष धरणे, परिचालक मयुरेश मांजरेकर आदी उपस्थित होते. गावात सर्व ग्रा.पं. सदस्य, सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व स्वयंसेवक यांनी सर्व कुटुंबांना घरपोच मास्क व साबण पुरविले. सरपंचांनी मास्क चा नियमित वापर करा तसेच साबणाने नियमित हात धुण्याचे आवाहन केले आहे. गावात एकूण २००० मास्कचे वाटप करण्यात आले आहे.