५० हजाराच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; संचार बंदीच्या काळात उपक्रम…
ओरोस ता.१५: कोरोनाच्या महसंकटात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने दिनांक ३१ एप्रिल पासून विविध टप्प्यामध्ये जिल्ह्यात संविता आश्रम-पणदुर,कुमामे – मालवण, सुकळवाड – मालवण,सोनाळे – वैभववाडी,मातोंड – वेंगुर्ले,शिरगाव – देवगड या ठिकाणी संचारबंदी मुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना सुमारे ५० हजात रुपयांचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज रोजी कोरोनाच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहे.या देशव्यापी संकटात योगदान देणाऱ्या आरोग्य यंत्रणेला शिक्षकाकडून हातभार लावावा म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चौके व त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील आरोग्यकर्मचारी यांच्यासाठी सुमारे ५ हजार रुपयांचे सॅनिटायजर व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक भारती चे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे, शिक्षक नेते विजय चौकेकर, शिक्षक भारती उपाध्यक्ष श्री. धानजी चव्हाण, श्री. भाग्यवंत बेहरे व ह्या उपक्रमाचे सूचक व हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेले श्री. संजय जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे
डॉ. कुबेर मिठारी, डॉ. दिलीप कदम, आरोग्य सहायक गणेश जाधव, इतर आरोग्य सहायक व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक भारती संघटनेने आरोग्य कर्मचारी याची काळजी घेवून देशव्यापी लढ्यात अधिक सक्षमपणे कार्य करण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.