सुरेंद्र बांदेकर;विमा संरक्षण द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी…
सावंतवाडी.ता,१५: आपल्या जीवावर उदार होऊन कोरोनाच्या काळात सुद्धा जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्या रेशन धान्य दुकानदारांचा यथोचित गौरव करा, अशी मागणी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी सभापती तथा नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे सैनिक,पोलीस, डॉक्टर आदी लोकांचे कौतुक केले,त्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू देऊन रेशन धान्य दुकानदार लोकांना सेवा देत आहे. त्यामुळे त्यांचाही यथोचित गौरव आहे. तसेच अशा प्रसंगात त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा यावी यासाठी त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे असे बांदेकर यांनी म्हटले आहे.