मनोज उगवेकर ; संबंधित विभागाने घ्यावी दखल….
वेंगुर्ले,ता.१५: शिरोडा सह वेंगुर्ला तालुक्यात बऱ्याच ठिकाणी बीएसएनएल ब्रॉड बँड सेवा बंद असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढत असून ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तरी संबनधित विभागाने याची दखल घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यानी केली आहे.
बँकांमध्ये बीएसएनएल ब्रॉड बँड सेवा बंद असल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. तासनतास गर्दी करून त्यांना उन्हात रांगेत राहावं लागतं आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गर्दी वर नियंत्रण राहण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करणे आवश्यक आहे. उपरोक्त परिस्थिती मुळे बँक कर्मचारी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जात आहेत. तरी याची दखल घेऊन उपाय योजना तात्काळ करून ही सेवा सुरळीत करावी अशी मागणी श्री. उगवेकर यांनी केली आहे.
दरम्यान गावातील स्वयंसेवक लोकांना रिसीट भरून देणे, पाणी देणे, सोशल डिस्टन्स ठेवणे याची विशेष सेवा देत आहेत. असेही त्यांनी सांगितले.