जिल्हा परिषद-आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन…
ओरोस ता १५: जिल्हातील आरोग्य यंत्रणा कोरोना साथीला रोखण्यासाठी एकवटली आहे.मात्र याच कालावधीत जिल्ह्यात माकडतापने डोके वर काढले आहे.माकडतापाचे रुग्णही सापडत असल्याने त्याबाबतही दक्षता घ्यावी,असे आदेश बुधवारी जि.प. चे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिले.दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत तीन रुग्णांचा माकडतापाने मृत्यू झाले असून २८ रुग्ण आढळले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांनी यावेळी दिली.
माकडताप संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीसाठीचे नमूने सध्या मिरज येथे पाठविण्यात येत आहे. मणिपाल येथील लॅब बंद झाल्याने शासनाने या तपासणीचे सॅम्पल मिरज येथे पाठवावे असे निर्देश दिले होते. त्यानुसार आठवड्यातून दोन वेळा रुग्णांची सॅम्पल्स मिरज येथे पाठविले जातात. या तपासणीला विलंब होत असल्याचे व रिपोर्ट विलंबाने येत असल्याचे निदर्शनास येताच जिपचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आठवड्यातून किमान तीनवेळा ही सॅम्पल्स मिरजकडे पाठवावीत असे आदेश दिले.
गेल्या तीन महिन्यांत माकडतापाने तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ही बाबही गंभीर असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे व संबंधित रुग्णांचे वेळेवर तपासणी करून तात्काळ नमूने लॅबकडे पाठवावे त्यासाठी अधिक वाहनांची व्यवस्था तात्काळ करून घ्यावी या कामात कोणती हयगय करू नये अशाही सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांना जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिल्या.