ओरोस ता १५: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच शासकीय कार्यालयांचे निजंर्तुकिकरण करण्यात येत आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये निजंर्तुकीकरण करण्यात आले.
लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर प्रथमच जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभा बुधवारी संपन्न झाल्या. लॉकडाऊनमुळे तहकूब झालेल्या समाजकल्याण समिती सभा, जलव्यवस्थापन व स्वच्छ्ता समिती सभा बुधवारी संपन्न झाली. तसेच दुपारच्या सत्रात स्थायी समितीची नियमित सभा झाली. यानिमित्त समिती सदस्य उपस्थित होते. बॅ नाथ पै सभागृहात या सभा झाल्या. त्यामुळे जिल्हा परिषद निर्जतुकीकरण करण्यात आली. यावेळी सभागृहात आलेल्या व्यक्तींना सॅनीटायझर हाताला लावण्यासाठी देण्यात आले. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंगचाही वापर शक्य तेवढा करण्यात आला. अवांतर चर्चाही टाळण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव, वाडी वस्ती, शहरे यांच्यासह ग्रामपंचायत आणि सर्व शासकीय निमशासकीय व सार्वजनिक इमारती औषधांची फवारणी करून निजंर्तुकीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी कामासाठी येत असतात तसेच नागरिक व ठेकेदारही येत असतात. त्यामुळे या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयात सोडियम हायपोक्लोराईड या रासायनिक द्रव्याची फवारणी करण्यात आली. जिल्हा परिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात ही फवारणी करण्यात आली हा परिसर निजंर्तुकिकरण करण्यात आला.