राजेंद्र म्हापसेकर;जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करण्याच्या जिल्हा परिषद बैठकीत सूचना …
ओरोस ता १५: लघु पाटबंधारे विभागमार्फत खोदाई करून ठेवण्यात आलेल्या बंधाऱ्यांची कामे लॉकडाऊनमुळे रखडली आहेत. मात्र ही कामे पावसाळ्या पूर्वी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे खोदाई केलेल्या अणि अर्धवट असलेल्या बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकड़े पाठपुरावा करा अशी सुचना उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केली. तसेच पाणी टंचाईची कामेही टंचाईची झळ बसण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांकडुन देण्यात आले.
जि प जल व्यवस्थापन समितीची तहकूब सभा जि.प. अध्यक्ष सौ. समीधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, महीला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य सरोज परब, श्वेता कोरगावकर, संजय आंग्रे, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
लघुपाटबंधारे विभागामार्फत ८५ बंधारऱ्यांच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आली असून काहि ठिकाणी बंधारे फोडुन दुसरा बांधण्यासाठी ची खोदाईहि करण्यात आली आहे. मात्र कोरोना च्या संकटामुळे सध्या हि कामे बंद ठेवण्यात आली आहेत. हि बंद ठेवलेली कामे सुरू झाली नाहित तर पावसाळयात या परीसरातील शेतीला धोका होणार आहे. शेतकऱ्यांचे भविष्यकालीन नुकसान टाळण्यासाठी हे बंधारे वेळीच पूर्ण करण्यात यावेत याकडे म्हापसेकर यांनी लक्ष वेधले.
दरम्यान एकाच ठेकेदाराला अनेक बंधाऱ्यांच्या कामांचे ठेके देण्यात आले असल्याचा आरोपहि यावेळी करण्यात आला. एकच ठेकेदार असेल तर वेळीच सर्व बंधारे पूर्ण होण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तसेच सतर्क राहुन कामे पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले. अपूर्ण बंधाऱ्यांची यादी प्रशासनाने तयार करून कोरोना मुळे पावसाळयात शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी या बाबीकडे जिल्हाधिकारी यांच्याकडे या कामांसाठी परवानगी देण्याबाबतच्या प्रस्ताव देण्याचे सांगण्यात आले.
टंचाईची कामे त्वरित करा
कडक उनामुळे आता पाणी टंचाईची झळ बसू लागणार आहे. त्यापूर्वी पाणी टंचाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्ष सौ नाईक यांनी यावेळी दिले.
“त्या” बंधारे बाधितांना भरपाई दया
सुमारे पंधरा वर्षापूर्वी बंधाऱ्यासाठी शासनाने संपादीत केलेल्या जमीनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्याला अद्याप देण्यात आलेला नाहि. याबाबत राजेंद्र म्हापसेकरय यांनी खंत व्यक्त करत जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यकत केली. अनेक वेळा उपोषणे करूनही शेतकऱ्याना न्याय दिला गेला नसल्याने याकडे गांभीर्याने बघुन तात्काळ न्याय देण्याची मागणी केली