सावंतवाडीत उपक्रम; आरोग्य प्रशासन पालिका कर्मचारी व पत्रकारांचा गौरव…
सावंतवाडी ता.१५: शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “घरपोच ॲप” या संस्थेच्या माध्यमातून आज याठिकाणी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना भाज्यांचे वाटप करण्यात आले. या सर्वांच्या सेवेचा गौरव म्हणून संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला,असे यावेळी बोलताना घरपोच अँप संस्थेचे प्रमुख जयवंत गवस यांनी सांगितले.
यावेळी एकनाथ गावडे,सुनील करडे,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.गवस म्हणाले,लॉकडाऊन काळात येथील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन घरपोच हा ॲप आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणला आहे.आणि अल्पावधीतच या आपला येथील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे ज्यांनी कोणी या सेवेचा लाभ घेतला नाही अशांनी घरपोच हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी,असे आवाहन केले आहे.तर या ॲपच्या माध्यमातून लोकांना भाज्या व फळे आधी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.यात या सर्व वस्तू थेट शेतकरी ते ग्राहक अशा पोहोचविण्याचा आमचा मानस आहे.त्यासाठी ग्राहकांबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे,व आपल्याकडील माल आमच्याशी संपर्क साधून विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.