आबा सावंतांच्या पुढाकारातून तहसील प्रशासन व घरपोच अँप यांनी केली मदत…
लॉंगडाऊन काळात माजगाव येथे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना आज येथील तहसील प्रशासन आणि “घरपोच ॲप” यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू व मास्कचे वाटप करण्यात आले.माजगाव माजी सरपंच आबा सावंत यांच्या पुढाकारातून या गरजूंना ही मदत देण्यात आली.
यावेळी श्री.सावंत,नायब तहसीलदार प्रदीप पवार,मंडल अधिकारी एस.आर.चिंदरकर,घरपोच अँपचे संस्थापक जयवंत गवत,एकनाथ गावडे,सुनील करडे,आशिष श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
या ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नव्हत्या.त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.याबाबत त्यांनी श्री.सावंत यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.त्यानुसार त्यांनी या गरजू कामगारांकडे तहसीलदारांचे लक्ष वेधले व त्यांना ही मदत मिळवून दिली. यावेळी त्यांना तांदूळ,कडधान्य व तेल आदिचे वाटप करण्यात आले.दरम्यान या सेवेत “घरपोच ॲप” संस्थेने सुद्धा सहभाग घेतला.व त्यांना ताज्या भाज्यांचे वाटप केले.