सावंतवाडीतील घटना; वेगुर्ला व कणकवलीत केले प्रत्येकी दोघांना कॉरन्टाईन…
सावंतवाडी ता.१५: गोव्यातूून सिधुदूर्गच्या दिशेने येणे जिल्ह्यातील चौघा युवतींना अंगलट आले आहे.त्यांच्यावर आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील दोन मुली वेगुर्ला तर दोन कणकवलीतील आहेत.त्यांना संबधित तहसिलदारांच्या ताब्यात देवून कॉरन्टाईन करण्यात आले आहे .
याबाबतची माहीती सावंतवाडी पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांनी दिली.संबधित मुली गोवा येथे एका फॅक्टरीत कामाला होत्या,त्या ठीकाणावरुन त्या आज सकाळी चालत सिधुदूर्गच्या सिमेत आल्या होत्या.याबाबतची माहीती काही लोकांकडुन देण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली असून सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,असे श्री.खोत म्हणाले.