Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागाण्यातून सोशल मीडियाद्वारे कोरोना विषयक जनजागृती...

गाण्यातून सोशल मीडियाद्वारे कोरोना विषयक जनजागृती…

प्रा. शिक्षक सुभाष साबळे यांचा प्रबोधनात्मक उपक्रम

वेंगुर्ला : ता.१५ भारतासह जगाला कोरोनानं हैरण केले असून अनेक डाॅक्टर, पोलिस, कर्मचारी अहोरात्र जनतेची सेवा करीत आहेत. तर लाॅकडाऊन या २१ दिवसांच्या काळात मातोंड शाळेतील प्राथमिक शिक्षक सुभाष साबळे हे घरी बसूनच मुलांच्या मनोरंजनासोबत उपलब्ध साहित्याचा वापर करून दररोज नवनवीन स्वरचित गीतांचा व्हिडिओ तयार करून व्हॉट्सॲप फेसबुक खाजगी टिव्ही चॅनल्स द्वारे महाराष्ट्रभर जनतेपर्यंत कोरोना विषयी जनजागृती केली. उद्यापासून ते कवितेच्या माध्यमातून हे प्रबोधनाचे काम सुरूच ठेवणार आहेत.
आज देशात प्रत्येकजण कोरोनाशी लढण्याचा प्रयत्न आपल्या परीने करीत आहेत, त्याचाच हा एक भाग म्हणता येईल. श्री. साबळे गाण्याच्या माध्यमानंतर आता कवितेद्वारे जनजागृतीचे कार्य करीत राहणार आहेत. यासाठी त्यांना त्यांची मूलं सुमित साबळे व स्नेहल साबळे साथ करीत आहेत. तसेच व्हिडिओ चित्रीकरण करण्यास त्यांच्या पत्नी सौ वैशाली साबळे यांचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान याचबरोबर त्यांनी अनेक परप्रांतीय गरजू कामगारांना प्राथ.शिक्षक भारती वेंगुर्ला संघटनेच्या वतीने अन्नधान्य वाटप केले, ते सध्या मातोंड वरचे बांबर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून स्काऊट चळवळीत उत्कृष्ट कबमास्टरदेखील आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments