रोहित पवारांचे ट्विट; कामे करणाऱ्या मशीन व्यवसायिकांवर कर्जाचा भार…
मुंबई ता.१६: पाणी टंचाईची कामे करणाऱ्या मशीन व्यवसायिकांना पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करण्यासाठी आवश्यक नियम-अटी घालून परवानगी द्या,अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
जेसीबी,पोकलेन, बोरवेल आदी मशीनची कामे शेती व पाण्याशी संबंधित आहेत.आणि मुख्यत्वे ती उन्हाळ्यात पूर्ण केली जातात.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सध्या ती बंद आहेत.त्यामुळे या मशीन व्यावसायिकांवर असलेला कर्जाचा मोठा भार त्यांना पेलवणार नाही.त्यामुळे त्यांना अटी घालून ही कामे सुरू करण्याची परवानगी द्यावी,असे श्री.पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.