Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू...

हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू…

उदय सामंतांचे आश्वासन; जिल्हयात माकडताप तपासणीसाठी प्रयोगशाळा…

दोडामार्ग/सुधाकर धर्णे,ता.१५: तालुक्यात स्थिरावलेल्या हत्तींचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येतील,त्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करण्यात येणार आहेत,अशी भूमिका पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे मांडली. दरम्यान माकड तापाची तपासणी करणारी प्रयोगशाळा जिल्ह्यात होण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येतील,त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे.असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,आपल्या जिल्ह्यातील नागरिकांनी या लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे सहकार्य केले,सर्व नियमांचे पालन केले.सर्व पक्षिय पदाधिकारी त्यााचबरोबर सामाजिक दातृत्व दाखवणाऱ्या सामाजिक संस्थांनी सामाजातील उपेक्षित लोकांची केलेल्या मदतसाठी या सर्वांना त़्यांनी धन्यवाद दिले.त्याचबरोबर तालुक्यातील शिवभोजन थाळीचे उद्दीष्ट जे पुर्वी ५० इतके होते.ते वाढवुन १०० पर्यत नेल्याचे त्यांनी सांगितले.
काजू पिकासंबधी ते म्हणाले की काजू बागायतदारांच्या समस्या मी समजून घेतल्या आहेत मंत्रीमंडळाच्या बैठकित जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन याविषयी मुद्दा नक्की मांडेन मात्र ते पुढे म्हणाले की काजू विकणारा आणि विकत घेणारा या दोघांनीही आपापसात सामजस्यांची भूमिका घेवुन पुढे याव अशी देखिल विनंती केली
तालुक्यातील हत्ती प्रश्नाबद्दल बोलताना ते म्हणाले की आपण वनविभागाशी याबाबत चर्चा करु आणि लोकांना या हत्तींचा त्रास होवु नये यासाठी काय उपाययोजना करता येतील हे यासाठी वनविभागाला सूचना करण्यात येतील.
भविष्यात या हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासंबधी आपण कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलुन काही उपाययोजना करता येतील यासाठी नक्की प्रयत्न करु असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments