वेंगुर्ला.ता,१६: संपूर्ण जगात व देशात निर्माण झालेल्या कोरोना महासंकटावर मात करण्यासाठी विविध स्वच्छता, आरोग्य, प्रबोधन व जनजागृती, मदतकार्य उपाययोजनांची अंमलबजावणी शासनामार्फत केली जात आहे. ‘टाळेबंदीच्या माध्यमातून घरी रहा‘, ‘सुरक्षित रहा तसेच सोशल डेस्टिनेशन पाळा‘ असे आवाहन केले जात आहे. लोकांमध्ये आरोग्य व स्वच्छता याविषयी जनजागृती व्हावी आणि या जागतिक महासंकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वास, मनोबल वाढावे या उद्देशाने रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊन पुरस्कृत रोटरॅक्ट व इंटरॅक्ट क्लब होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वेंगुर्ला यांनी विविध संदेश देणारी ध्वनिचित्रफित बनविली आहे.
यात शासकीय सुचना पाळा, आरोग्य सेतु अॅप वापरा, हात वारंवार धुवून स्वच्छ करा, मास्क वापरा, सॅनिटाइजरचा योग्यरितीने वापर करा, योग्य समतोल आहार घ्या, योगासने व व्यायाम करा, प्राणायाम करा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, घरी रहा-सुरक्षित रहा, सोशल डेस्टिनेशन पाळा असे विविध प्रकारचे रोगप्रतिबंधक लोकजागृतीचे संदेश दिले आहेत.
अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथी मेडीकल कॉलेज रोटरॅक्ट व इंटरॅक्ट क्लबचे स्वप्निल परब, निहाल नाईक, श्रुती शेडगे, स्नेहल भोईर, सिध्दी चव्हाण, स्मिता पाटील, श्रावणी तुळसकर, बेरमनी गुडल्ला, रिझवान बोबडे, दत्तप्रसाद पवार, योगेश सांळुखे, दुर्गेश पाटील, सिध्दी बोबाटे, श्वेता खरात, निकीता रावराणे, ईशा सावंत, कोमल जगाडे, सर्जील करजीकर सदस्यांनी यात सहभाग घेतला आहे. शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सुचना सर्वानी प्रामाणिकपणे पाळल्यास, या कोरोना महासंकटावर मात करुन, महाराष्ट्र-भारत पुन्हा सुरक्षित, आनंदी, प्रगतशील लोकजीवन सुरू करु शकतो. यासाठी निश्चयपूर्वक टाळेबंदी पाळा व आत्मविश्वासाने रहा असे आवाहन ‘मुस्कुरायेगा इंडिया….. जितेगा इंडिया‘ या ध्वनिचित्रफितीद्वारे करण्यात आले आहे. या ध्वनिचित्रफितीची निर्मिती व संकल्पना रोटरॅक्ट प्रेसिडेंट स्वप्निल परब, संदेश निर्मिती सेक्रेटरी श्रुतिका शेडगे यांची असून, व्हाईस प्रेसिडेंट निहाल नाईक व इंटरॅक्ट प्रसिडेंट सर्जिल कर्जीकर यांनी सहाय्य केले आहे.
वेंगुर्लेत रोटरॅक्टच्या वतीने ध्वनिचित्रफितीतून कोरोना बाबत जनजागृती…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES