आमदार प्रसाद लाड यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द…
ओरोस ता १६भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांचेकडून जिल्हा प्रशासनाला १० लाखाचा निधी देण्यात आला. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे हा निधी सोपविण्यात आला.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीचे सेवा कार्य सुरू आहे.विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे मुंबई निवासी असून मुंबईमध्ये त्यांचे मोठे काम सूरु आहे. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी त्यांच्याकडून अन्नधान्य, पीपीई किट, मास्क आणि सॅनिटायझर स्वरूवात भरीव मदत देण्यात आली.
गुरुवारी प्रसाद लाड यांनी आज जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीची आणि मदत कार्याची माहिती घेतली.
तसेच मंजुलक्ष्मी यांचेकडे आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयांचा विशेष निधी सुपूर्द करणेबाबतचे पत्र दिले.
या निधीतून आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना आरोग्य साहित्यासाठी रुपये ५ लाख व पोलीस कर्मचारी यांच्यासाठीच्या आरोग्य विषयक साहित्य खरेदीसाठी रुपये ५ लाख असे खर्च करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांना दिल्या.तसेच पोलीस कर्मचारी यांच्यासाठी ५० पीपीई किट पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांचेकडे सुपूर्द केले.अजूनही आवश्यक आरोग्य साहित्य लागल्यास ते पुरविण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते.