शिरोडा हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या ६९ वाहन चालकांना पोलिसांचा दणका…

149
2
Google search engine
Google search engine

१४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल

वेंगुर्ले.ता,१६: संचारबंदीचे आदेश असताना कायद्याचे उल्लंघन करत शिरोडा हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या ६९ वाहनांवर वेंगुर्ला महिला पोलिसांनी धकड कारवाई करत १४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान, पोलीस हवालदार परुळेकर यांनी ही कारवाई केली. दम्यन यावेळी काही वाहन चालकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तर काहींनी आपल्या मोठमोठ्या ओळखिही दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला पोलिसांनी कोणाचेही काहीही ऐकून न घेता ही धडक कारवाई केली.
संचारबंदिचे सक्त आदेश असताना काहीही काम नसताना शिरोडा हद्दीत, बाजारपेठेत, वरची केरवाडी येथे फिरणा-या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली.काही वाहन धारक मागच्या मागे पळुन गेले. काही वाहन धारक खोटे बोलुन वाहन चालवित असताना यावेळी आढळून आले. काही वाहन चालकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. संचारबंदीचे आदेश असताना घराबाहेर कामा व्यतिरिक्त का  फिरता असे विचारले असता त्यांनी पोलीसांशी हूज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही वाहन धारकांनी आपल्या मोठमोठ्या ओळखीही दाखविण्याचा केला प्रयत्न परंतु पोलिसांनी कोणाचेही न ऐकता आपले काम केले. या कारवाई बद्दल शिरोडा येथील स्थानिक लोकांनी रस्त्यावर भर उन्हात उभे राहुन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असणाऱ्या या पोलीसांचे आभार मानले.