Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नवसरणी परिसरातील घटना; सावंतवाडी वनविभागाच्या दिले ताब्यात
सावंतवाडी ता.१७: येथील नवसरणी परिसरात आज सकाळच्या सुमारास जखमी अवस्थेत एक घुबडाचे पिल्लू आढळून आले आहे.दरम्यान हा प्रकार तेथील युवक श्रीपाद रेमुळकर व नरेन्द्र प्रभू यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या पिल्लाला जीवदान देत वनविभागाच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित घुबडाचे पिल्लू प्रभू यांच्या घराशेजारील गटारात जखमी अवस्थेत पडून होते.दरम्यान ही बाब प्रभू यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या पिल्लाला गटाराच्या बाहेर काढले व प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले.
Download WordPress Themes Nulled and plugins.