अरुण भिसे; छायाचित्रकार व्यवसायिकांकडून मदतीची याचना नको…
सावंतवाडी ता.१७: कोरोनाचे संकट राज्यावर तसेच देशावर असताना आम्ही छायाचित्रकार म्हणून या अवस्थेत शासनाकडे मदतीची अपेक्षा न करता अशा संकटात सर्वाच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे.आणि त्यासाठी सर्वानी एकत्र येवूया,असे आवाहन सिंधुदूर्ग जिल्हा छायाचित्रकार,चलचित्रण संघटनेचे अध्यक्ष अरुण भिसे यांनी केले आहे.अशा परिस्थितीत शासनाला काही आमची छायाचित्रकार म्हणून मदत लागल्यास ती आम्ही विनामोबदला देण्यास तयार आहोत.दरम्यान या संकटापुर्वी आम्ही आपल्या छायाचित्रांनी हा देश सुंदर बनविला होता.मात्र आता संकटात शासनाच्या पाठीशी राहून लवकरच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करू,असेही श्री.भिसे यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात सर्वाचेचं नुकसान झालेले आहे.यात छायाचित्रकार सुटलेले नाहीत.ऐन हंगामात हा आजार आल्यामुळे या व्यावसायावर अवलंबून असलेले अनेक जण देशोधडीला लागले आहेत.अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत एक संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी सर्वाचे दुख समजू शकतो,परंतू ही वेळ शासनाकडे मदत मागण्याची नाही,जे आमच्या परिने सहकार्य होईल ते आम्ही निश्चीतच देण्याचा प्रयत्न केला पाहीजे.भविष्यात कोरोनाचे संकट दुर झाल्यानंतर शासन आमच्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करेल,यात काही शंका नाही.त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी तसेच सदस्यांनी आता सकारात्मक भूमिका घेवून,शासनाला सहकार्य करणे अपेक्षीत आहे.असेही श्री.भिसे यांनी सांगितले.
दरम्यान श्री.भिसे यांनी केलेल्या या आवाहनाला उपाध्यक्ष राजेश पारधी,घनश्याम आळवे,सुरज राऊळ,माजी जिल्हाअध्यक्ष भूपेंद्र सावंत,दत्तप्रसाद सातार्डेकर आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.