संजय कुमार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घरमालकांना सूचना…
मुंबई ता.१७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना सध्या आर्थिक चणचण सोसावी लागत आहेत.अशा परिस्थितीत उत्पन्नाचे प्रमाण घटल्यामुळे भाड्याच्या घरात राहणार्या भाडेकरूंना भाडे देणे कठीण बनले आहे.त्यामुळे अशा घर मालकांनी आपल्या भाडेकरूंना भाडे देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढ द्यावी,तसेच उशिरा भाडे भरल्यास त्याच्याकडून अतिरिक्त रक्कम वसूल करू,नये अशा सूचना गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिल्या आहेत.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे.यातील सर्वच भाडेकरू हे नोकरी व्यवसायावर अवलंबून आहेत.दरम्यान सद्यस्थितीत लॉकडाऊन काळात सर्वच कामे बंद झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे मार्ग सुद्धा बंद झाले आहेत.त्यामुळे अशा भाडेकरूंना घर भाडे देणे सद्यस्थितीत तरी पेलवणारे नाही.अशा परिस्थितीत घर मालकांकडून त्यांना दिलासा मिळणे अपेक्षित आहे.यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व आपल्या भाडेकरू कडून तीन महिने भाडे वसूल करू नये,तसेच भाड्याची रक्कम थकली म्हणून त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम घेऊ नये,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.