बांदा पोलिसांची कारवाई;चार लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त…
बांदा.ता,१७: गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने अत्यावश्यक आयशर कॅटर मधून गोवा बनावटीच्या चोरट्या दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी कारवाई करून १९ हजार ८० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ४ लाख ६९ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक विशाल सुभाष कोठावळे (वय ३४, रा. शिरोळ, कोल्हापूर) आणि अभिजित राजेश पाटील (वय २६, रा. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई आज दुपारी पत्रादेवी येथे पोलीस तपासणी नाक्यावर करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजीची वाहतूक करणारा आयशर कॅटर (एमएच १० झेड३३७०) गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. कँटरवर अत्यावश्यक सेवा लिहिले होते. कँतरच्या पाठीमागील हौद्याची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले. पोलिसांनी दसरुसह कॅटर जप्त केला.
ही कारवाई हवालदार महेश भोई व महामार्ग पोलिसांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.