शिल्लक माल विक्रीस १९ पर्यंत मुभा ; पालिकेच्या तातडीच्या बैठकीत निर्णय…
मालवण, ता. १७ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रीवर १८ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. सध्या ज्या भाजी, फळ विक्रेते यांच्याकडे शिल्लक असलेला भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र स्थानिक तसेच जिल्ह्यातील भाजीपाला, फळे यांना विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. आज पालिकेत सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.