Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआता पोलिसांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी होणार...

आता पोलिसांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी होणार…

सिंधुदुर्गनगरी.ता,१७: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोलीस दल सतर्कपणे कर्तव्यावर आहे. आशावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा जनतेशी नित्य संपर्क येत असतो. पण, ज्या व्यक्तीशी संपर्क झाला आहे त्यास कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कसे हे माहित नसते. त्यामुळे कर्तव्यावर असताना नकळत पणे पोलीस कोरोना विषाणूच्या संपर्कात येऊ शकतात. हा धोका लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मध्यम ते तीव्र खोकला, कोरडा खोकला, घशात खवखवणे, श्वास घेण्यास अडथळा, छातीत दुखणे, अशक्तपणा, ताप इ. सारखी लक्षणे आढळून आल्यास त्याविषयी पोलीस अधिक्षक कार्यालयास तात्काळ कळविण्यात येते. यासाठी Sindhudurg Health Cheeklist या नावाने ऑनलाईन स्प्रेडशिट तयार करण्यात आली आहे.
यामुळे जिल्हा कोरोना मुक्त रहावा यासाठी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोणहीती प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यातील काही वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे किंवा व्हीडीओकॉलद्वारे औषधांची माहिती घेऊन टेलिमेडीसीन पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments