बांदा
गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी तपासणी नाक्यावर केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 80 हजाराच्या दारूसह दोन गाड्या मिळून तब्बल वीस लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई काल रात्री पत्रादेवी तपासणी नाक्यावर करण्यात आली किशोर बबन मोरे वय 25 रा. निमगाव ता. शिरूर जिल्हा बीड, सागर चंद्रकांत कदम वय 25 रा. चिंचोली जि. सातारा, विजय पंढरीनाथ बर्गे 31 रा. कोरेगाव जिल्हा सातारा अशी त्यांची नावे आहेत.
यातील संशयित हे आपल्या गाडीतून बेकायदा गोवा बनावटी दारू घेऊन गोव्याहून आंबोलीच्या दिशेने जात होते यावेळी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत हा मुद्देमाल आढळून आला.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, हवालदार देसाई, नाईक ,मिठबावकर, डी.जी.गोळे आदींनी केली
बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी तिघे ताब्यात…..
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES