सुरेश प्रभूंचा पाठपुरावा आला कामी; १८४६ टन आंंबा वाहतूकीला दिली परवानगी…
मालवण ता.१८: कोरोनाच्या पार्श्वभूूमिवर संकटात असलेल्या आंबा व्यावसायिकांना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिलासा दिला असून आंब्याची आखाती देशात वाहतूक करण्यासाठी हीरवा कंदील दिला आहे.याबाबतची माहीती माजी केद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की,पंतप्रधानाच्या कुशल नेतृत्वामुळे शेतकर्यांना कोरोनाच्या काळात सुध्दा फायदाहोणार आहे,या काळात आंबा परदेशात जाणार की नाही याबाबत शंका होती.मात्र त्यासाठी आवश्यक असलेली परवागनी त्यांनी दिली आहे.याची पहीली वाहतूक एअर इंडीयाच्या विमानाने ता १३ एप्रिलला लंडन येथे होणार आहे.त्यानतर त्यात नियमितता ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.यात कोकणतातील १८४६ टन आंंबा वाहतूकीला परवागनी देण्यात आली आहे,असे श्री.प्रभू यांनी म्हटले आहे.