Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभिरवंडेत सतीश सावंतांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप....

भिरवंडेत सतीश सावंतांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप….

कणकवली ता.१८: भिरवंडे व खलांतर गांधीनगर गावातील संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ व वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या योजनांचे लाभार्थी तसेच गरजू कुटुंबांना सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी तेलपिशवी, मीठ पिशवी, कुळीथ, बटाटे, चहापावडर, तुरडाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून ते वितरीत करण्यात आले.
भिरवंडे व गांधीनगर ग्रा.पं. येथे झालेल्या वितरण कार्यक्रमात ७० किट वितरीत करण्यात आले.गावातील सुमारे २०० कुटुंबांना याचा लाभ देण्यात येणार आहे.लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर विशेषतः वृद्ध नागरिकांना प्रवासासाठीचे साधन नसल्याने बाजारात जाणे शक्य होत नाही.त्याचप्रमाणे अनेक गरजू कुटुंबांकडे आर्थिक टंचाई निर्माण झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा स्थितीत सामाजिक बांधीलकी जोपासत अशा वृद्ध व गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
भिरवंडे ग्रा.पं. येथे सतीश सावंत यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या सौ. राजलक्ष्मी डिचवलकर, पं.स.सदस्य मंगेश सावंत, माजी पं.स.सदस्य महेंद्र डिचवलकर, भिरवंडे सरपंच देवेंद्र सावंत, ग्रामसेवक राकेश गोवळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश घाडीगांवकर, बेनी डिसोजा, तलाठी समृद्धी गवस, विशाल सावंत तर गांधीनगर-खलांतर येथे सरपंच सौ. मनीषा सावंत, माजी सरपंच शेखर सावंत, अविनाश सावंत, गुरूप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments