वैभववाडी,ता.१८: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करूळ ग्रामपंचायतच्या वतीने गावातील शासकीय कर्मचारी व ग्रामस्थांना मास्क व सँनिटाईजर चे वाटप करण्यात आले. घरातील प्रत्येक सदस्याला मास्क देण्यात आले आहे. तर प्रत्येक कुटुंबाना सॕनिटाईजर देण्यात आले.
करूळ बँक व सोसायटी याठिकाणी कर्मचारी व ग्राहकांना मास्क देतेवेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, सरपंच सरिता कदम, माजी पं. स. सदस्य बाळा कदम, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र गुरव, पांडुरंग गुरव, दिपा पाटील, मनिषा राऊत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामसेवक शशिकांत गुरव, व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो – करूळ येथील केदारलिंग सेवा सोसायटी याठिकाणी कर्मचाऱ्यांना मास्क सँनिटाईजर चे वाटप करतांना जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, सरपंच सरिता कदम, बाळा कदम व इतर.