वैभववाडी,ता.१८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारीचा प्रश्न भेडसावणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील ५० परप्रांतीय कुटुंबाना भाजपा आ. नितेश राणे यांनी जीवनावश्यक वस्तू पुरविल्या आहेत. या अन्नधान्य किटचे वाटप भाजपा वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संजय सावंत उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित परप्रांतीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री. काझी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात आमदार नितेश राणे यांनी अगदी सुरुवातीपासून मदतीचा हात देत आले आहेत. डॉक्टरांना लागणारे सुरक्षा कवच, मुंबईतील कुटुंबाना लागणारे अन्नधान्य ते ग्रामीण भागातील परप्रांतीय मजुरांना मदत यात आ. नितेश राणे पुढेच राहिले आहेत. लाँकडाऊन असल्याने परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जाऊ शकत नाही. त्यांना आहे त्या ठिकाणी राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. भाजपा मार्फत त्यांना मदत केली जात आहे. यापूर्वीही जवळपास १२ गावात रहाणा-या परप्रांतीय मजुरांना भाजपा मार्फत अन्नधान्य पुरविण्यात आले आहे.
फोटो -वैभववाडी भाजपा कार्यालयात काही परप्रांतीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगरसेवक संजय सावंत व इतर.