बाबू कुडतरकर; स्थानिक भाजी विक्रेत्यांकडून शुल्क आकारू करू नये…
सावंतवाडी ता.१८: लॉकडाउन काळात पालिकेच्या व्यापारी संकुलात असलेल्या गाळेधारकांना भाडे माफ करण्यात यावे,तसेच ग्रामीण भागातून येणार्या स्थानिक विक्रेत्यांकडून शुल्क आकारू नये,अशी मागणी सावंतवाडी शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केली आहे .याबाबत त्यांनी आज पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना निवेदन दिले आहे.
यात असे नमुद करण्यात आले आहे की, लॉकडाउनच्या काळात गेले अनेक दिवस बाजार बंद आहे.त्याचा फटका व्यापार्यांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे पालिकेने त्यांना गाळ्यांच्या भाड्यात सुट द्यावी ,तसेच संकेश्वर-बेळगाव आदी भागातून येणारा भाजीपाला बंद करण्यात आल्यामुळे येथिल नागरीकांची गैरसोय होवू नये,यासाठी ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात यावा.व संबधित गावातील व्यापार्यांना पालिकेने सुट द्यावी,असेही या निवेदनात म्हटले आहे.