कणकवली, ता.18 ः शहरातील पटकीदेवी मंदिरालगत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस नाईक यांना धमकावल्याप्रकरणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य तिघांवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांवर मात्र अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही.
16 एप्रिल रोजी पोलिस नाईक शहरातील पटकीदेवी मंदिर लगत बंदोबस्ताला होते. त्यावेळी जावेद शेख हा कार्यकर्ता त्या भागातून सतत ये जा करत होता. त्याला जमादार यांनी हटकले. तसेच ये-जा न करण्याची सूचना दिली. त्यावेळी जावेद याने पोलिस नाईक जमादार यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर जावेद याला पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले. ही बाब समजताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे हे कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले. तेथे त्यांनी वादावादी केली तसेच मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलिस नाईक जमादार यांनी दिली. त्यानुसार कणकवली पोलिसांनी नलावडेंसह अन्य तिघांविरोधात भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34, 186, 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कणकवली नगराध्यक्षांसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES