वैभववाडी/पंकज मोरे.ता,१९: भुईबावडा परिसरात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखदा धक्का दिला आहे. या पावसामुळे आंबा, काजू बागायतींचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात गेले आठ दिवस उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. शनिवारी दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते. रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार तडाखा देत उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. आंबा, काजू उत्पादनाचा हंगाम आहे. या अवकाळी पावसाने या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.