नितेश राणेंचा सवाल; ग्रीन झोनमध्ये समावेश करण्याची केली मागणी…
कणकवली ता.१९: मागील चौदा दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण सापडलेला नाही,मग आमच्या जिल्ह्याचा ऑरेंज झोन मध्ये समावेश का करण्यात आला?, असा सवाल आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.दरम्यान आमच्या सिंधुदुर्गचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील जनता आणि प्रशासन एकजुटीने कोरोना रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर श्री.राणे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश व्हावा,असे त्यांनी म्हटले आहे.