महेश सारंग;बेकायदा जमाव करणाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी
सावंतवाडी.ता,१९: कोलगाव येथे दोन धर्मियात वितुष्टता निर्माण करण्यामागे नेमका खरा सूत्रधार कोण याचा शोध घ्या.तसेच या प्रकारा दरम्यान विनाकारण जमाव करून शासनाच्या नियम व अटी तोडण्यास जबाबदार ठरणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी सावंतवाडी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की सावंतवाडी पंचायत समितीचा माजी उपसभापती सरपंच व भाजपचा तालुकाध्यक्ष म्हणून मी काम केलेले आहे.१६ तारखेला कोलगाव कोकण कॉलनी येथे घडलेली घटना आपल्याला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कळली.त्यात एकदा युवकांनी आपल्या मोबाईल वरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला असल्याचे कळले.त्यानंतर झालेल्या वादात मुलांच्या आई-वडिलांना धक्काबुक्की मारहाण व शिवीगाळ करण्यात आली.असे कळले मात्र संबंधित घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक नागरिक इतर बाहेरून येणाऱ्या तरुणांचा समावेश जास्त असल्याचे माझ्या निदर्शनास आले हा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत.
आपण वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.परंतु चर्चा केल्यानंतर सुद्धा अपयश आले.आपण गेली अनेक वर्षे कोलगाव गावाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.येथील सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे.असताना काही विघ्नसंतोषी लोक येऊन दोन धर्मांमध्ये हेतुपुरस्कर ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालण्यात येऊ नये, तसेच या प्रकारामागे नेमका सूत्रधार कोण याची चौकशी करण्यात यावी व संबंधित ठिकाणी जमा करणाऱ्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.