शशिकांत खोत; घरा जवळ जमलेल्या जमावाच्या तपासाबाबत न्यायालयाकडे मागीतली परवानगी…
सावंतवाडी ता.१९: लॉकडाउनच्या काळात जिल्हाधिकार्यांनी दिलेले जमावबंदीचे आदेश असताना येथिल पोलिस ठाण्यात अनधिकृतरीत्या जमाव केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दहा लोकांसह अज्ञात चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्या त्या युवकाच्या घरी जावून त्यांच्या आईवडीलांना मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर आपली कायदेशीर फीर्याद घ्यावी,अशी मागणी संबधित युवकाच्या वडीलांनी पोलिसांकडे केली आहे.त्यानुसार न्यायालयाकडे तसा अहवाल सादर करण्यात आला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडुन सांगण्यात आले.
सावंतवाडी-कोलगाव सिमेवर असलेल्या कोकण कॉलनीतील एका युवकाने सोशल मिडीयावर दोन धर्मात तेढ निर्माण होणारी पोस्ट टाकली होती.यावरुन वादंग झाला होता.दरम्यान याबाबत संबधित एका गटाने तक्रार दिल्यानंतर पोस्ट टाकणार्या त्या युवकाला अटक करण्यात आली.मात्र तत्पुर्वी काही लोक त्या युवकाच्या घराजवळ जमाव करून गेले,तसेच त्याच्या आईवडीलांना मारहाण केली.अशी तक्रार त्याच्या वडीलांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात केली होती.त्यानुसार येथिल पोलिस ठाण्यात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारा दरम्यान जिल्हाधिकार्यांचे जमावबंदीचे आदेश असताना पोलिस ठाण्याच्या आवारात काही लोकांनी गर्दी केली,तसेच आदेशाचा अवमान केला,असा ठपका ठेवून संबधित चाळीसहून अधिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,असे पोलिस निरिक्षक श्री.खोत यांनी सांगितले.