फलक न लावणार्यांवर कारवाई करा; गुरूदास गवडेंची जिल्हाधिकार्यांकडे मागणी…
बांदा ता.१९: लॉकडाउनच्या काळात काही दुकानदारांकडुन सर्वसामान्य लोकांना लुटण्याचे प्रकार सुरू आहेत.यात जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे,त्यामुळे हे प्रकार जिल्हाधिकार्यांनी तात्काळ रोखावेत,अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी केली आहे.दरम्यान मालाचा अपुरा पुरवठा असल्याचे सांगुन काही दुकानदार चढ्या भावाने माल विकत आहेत.त्यामुळे दुकानाच्या बाहेर दरपत्रक लावण्याचे आदेश देवून सुध्दा ते धुडकावण्याचा प्रयत्न करणार्यांवर कडक कारवाई करा,अशीही मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.यात असे नमुद करण्यात आले आहे की,लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूचा पुुरवठा कमी प्रमाणात होत आहे,असे सांगुन काही दुकानदार चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकत आहे.यात साखरेचे दर पन्नास रुपये तर सहाशे रुपयाचे पंचविस कीलो तांदळाचे पोते नउशे रुपये,नव्वद रुपयाची तेल पिशवी शंभर रुपये,असे दर आकारण्यात येत आहे .हा सर्व प्रकार लोकांच्या अडचणीच्या काळात सुरू आहे.लॉकडाउन मध्ये उदयोग धंदे बंद असल्याने आधीच सगळे मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संबधित दुकानदारांना फलक सक्तीचे करा,आणि आदेश धुडकावणार्यांवर कडक कारवाई करा,अशी मागणी त्यांनी केली आहे.