सिंधुदुर्गनगरी ता.२०: पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब गरजू कुटुंबांना तब्बल ३० टन धान्याचा पुरवठा केला जात आहे.प्रत्येक गावा गावात शिवासेना पदाधिकारी कार्यकर्ते या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.काल आशिये गावातील गरीब गरजू कुटुंबांना या धान्याचे वाटप शिवसेना शाखाप्रमुख संदीप जाधव यांनी केले.दरम्यान शिवसेनेच्या या मदतीबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. काम बंद असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब गरजू , हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना पैशांच्या कमतरतेमुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना अडचणी येत आहेत.शिवसेना नेहमीच संकट काळात गरिबांच्या पाठिशी राहत आली आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी आशा लोकांना दिलासा दिला असून त्यांच्या वतीने तब्बल 30 टन धान्य वाटप केले जात आहे. यामध्ये तांदूळ, साखर, मसाला, तूरडाळ, आटा, हळद अशा वस्तूंचा समावेश आहे.
शिवसेनेकडून आशिये गावात गरजू कुटुंबांना जीवनावश्यकवस्तूंचे वाटप…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES