खासदारांचे आवाहन; स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा देण्याच्या मुख्याधिका-यांना सूचना…
सावंतवाडी. ता,२०: बेळगाव-संकेश्वर मधून येणारी भाजी काही दिवस खाऊ नका,असे आवाहन करीत कोणाची गैरसोय होवू नये,यासाठी स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी,अशा सुचना पालिकांच्या मुख्याधिकार्यांना दिल्या आहेत,अशी माहीती खासदार विनायक राउत यांनी आज येथे दिली.दरम्यान जिल्ह्यातील केसरी कार्डधारकांना सुध्दा आता धान्य पुरवठा केला जाणार आहे.ज्या ठीकाणी धान्य साठा आहे.त्या ठीकाणच्या लाभार्थ्यांना पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.तर येत्या दोन दिवसात बाकीच्या लोकांना सुद्धा पुरवठा केला जाईल,असेही श्री.राउत यांनी सांगितले.
श्री.राऊत यांनी आज पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात भेट दिली.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख रुपेश राउळ,विधानसभा संपर्क प्रमुख विक्रात सावंत,शब्बीर मणीयार,अनारोजीन लोबो,शहरप्रमुख बाबू कुडतरकर,सागर नाणोसकर,नागेंद्र परब,रुची राउत,योेगेश नाईक,अर्पणा कोठावळे,प्रशांत कोठावळे,अशोक दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.राउत म्हणाले,लॉकडाउन काळात शिवसेनेच्या माध्यमातून गोव्यात अडकलेल्या सुमारे बारा हजारहून अधिक लोकांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यात आला,मात्र हे करीत असताना काही लोकांसारखे आम्ही अर्धवट गाड्या नेवून स्वतःची प्रसिध्दी करुन घेतली नाही,ही वस्तूस्थिती आहे.तसेच जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतिय कामगारांची सुद्धा चांगल्याप्रकारे काळजी घेत त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, आता लॉकडाउन उठविण्यात आले आहे.त्यामुळे घरबांधणीसारखी काही कामे विशेष बाब म्हणून सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.त्याच बरोबर जांभा व काळ्या दगडाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.यावेळी लॉकडाउन३ मे नंतर उठल्यास या ठीकाणी येणार्या लोंढयाकडुन पुन्हा या ठीकाणी प्रादुभाव होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी,यासाठी आवश्यक असलेल्या सुचना आम्ही जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.माजी पालकमत्री दिपक केसरकर मुंबईत असून ते स्वतः कॉरन्टाईन होवून जिल्ह्यासह आपल्या मतदार संघात लक्ष ठेवून आहेत.तर पालकमंत्री उदय सामंत यांनी सुध्दा जिल्ह्याचा अनेक वेळा दौरा करुन आवश्यक त्या सुचना केल्या आहेत.त्यामुळे कोण टिका करीत असेल,तर ते चुकीचे आहे,असेही श्री. राउत म्हणाले.