वेंगुर्ला,ता.२०: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतीक सदस्य कृष्णा उर्फ अविनाश चमणकर यांचे बांधकाम व्यवसायातील सहकारी प्रसिद्ध उद्योगपती कमलेभाई मेहता यांच्या मातोश्री श्रीमती शांतीदेवी मेहता यांनी शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावातील २१० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती शांतीदेवी मेहता यांच्यावतीने तालुक्यातील इतर गरजुंना टप्प्या टप्प्याने अन्न धान्य वाटप केले जाणार आहे.
करोना विषाणूंचा संसर्ग जगभरात वाढला आहे. भारतासारख्या प्रगतशील देशालाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असल्याने सर्व कारभार ठप्प झाला. करोना विषाणूंच्या संर्सगामुळे हाताच्या पोटावर जगणा-या कुटुंबांचे अतोनात हाल होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतल्यानंतर महाआघाडी सरकारला या संकटावर उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले. फेसबुक लाईव्ह वरुन राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशवासीयांना जिवनावश्यक वस्तुंचे, औषधांचे वाटप करावे असे आवाहन केले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित सामंत व पक्ष निरीक्षक बाळ कन्याळकर यांनी जिल्हातील पदाधिकारी यांना प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी अशा सुचना दिल्या. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी तात्काळ घेऊन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कृष्णा उर्फ अविनाश चमणकर यांना वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यानंतर उद्योगपती कमलेभाई मेहता यांच्या मातोश्री श्रीमती शांतीदेवी मेहता यांनी वेर्गुल्याचे व्यापारी अश्र्विन पांगम यांच्या पांगम ब्रर्दस यांच्या खात्यात धनादेशाद्वारे रोख रक्कम जमा केली, त्याद्वारे आज पहिल्या टप्यात वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गरजुंना तांदुळ, तुरडाळ, तेल, साखर, पावडर, कांदे, बटाटे, पीठ सह अन्य जीवनावश्यक वस्तुचे पॅकेट मातोश्री श्रीमती शांतीदेवी मेहता यांच्यावतीने घरोघरी जाऊन सुमारे २१० कुटुंबाना वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रसाद चमणकर यांच्या हस्ते धान्यवाटप करण्यात आले. यावेळी सर्व गरजुंना अन्न धान्याचे वाटप करताना शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सर्वांनी घरीच थांबावे हात स्वच्छ धुवा व मास्कचा वापर करा असा संदेश वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेवतीने गावा गावात देण्यात आला.यावेळी सोशल डिस्टंन्सने धान्याचे वाटप गावा गावात घरो घरी करण्यात आले.