मुंबई, ता.२० : कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वत्र सॅनिटायझर डोम आणि टनेल उभारण्यास सुरुवात झाली. पण, ते बिनकामाचे असून त्यामुळे व्यक्तींना अपाय होण्याचा धोका आहे.त्यामुळे केंद्र सरकारनेही अशा टनेलवर बंदी आणली आहे.सॅनिटायझर टनेल किंवा डोमचा वापर करू नये,असे निर्देश केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी आदींना पत्र पाठवून राज्यात अशा प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळवले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याचा व्यक्ती किंवा समूहावर वापर केला जात आहे.त्यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही.त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.
*काय असते सॅनिटायझर टनेल…*
सोडियम हायपोक्लोराईड रसायन यात वापरले जाते
घरातील ब्लिचिंग पावडर प्रमाणे हे रसायन असते. त्यामुळे निर्जंतुकीकरण होते, पण ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते
प्रामुख्याने त्वचेला किंवा डोळ्यांना अपाय होऊ शकतो