कणकवली ता.२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात सिंधुदुर्गात शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.दरम्यान आज याच उपक्रमाच्या माध्यमातून असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवनावश्यक वस्तुंची कमतरता भासु नये म्हणुन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत.त्यातूनच जिल्ह्यातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु आहे. या उपक्रमाला आज तालुक्यात असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात धान्य वाटप करुन सुरुवात करण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व वृद्धांच्या तब्येतीची यावेळी विचारपुस देखील केली.तसेच भविष्यात आश्रमाला लागेल ती मदत करण्याची ग्वाही शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, आश्रमाचे संचालक संदेश शेट्ये, संचालिका दिपिका रांबाडे, शाखाप्रमुख राजा म्हसकर, सुरेश मेस्त्री, संतोष जेठे, निखिल साटम, आश्रमाच्या पुनम पवार, सायली इंदप आदी उपस्थित होते.