मुख्यमंत्री निधीसाठी २० हजारांची मदत;तहसीलदारांकडे धनादेश सुपूर्द…
कणकवली,ता.२०: कोविड १९ अर्थात कोरोना साथ रोगाशी टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी राज्यातील जनतेला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापारी लिलाधर गोवेकर यानी सामाजिक बांधिलकी जोपासत २० हजार रुपयाचा धनादेश तहसिलदार आर.जे.पवार यांच्याकडे सुपुर्द केला.दरम्यान श्री.गोवेकर यानी यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्यातील सामाजिक बांधिलकीचे भान दाखवुन दिले.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्याने सर्वांचेच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहेे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असुन कणकवली बाजारपेठेतील व्यापारी लिलाधर गोवेकर यानीही समाजभान राखत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. 20 हजार रुपयांचा धनादेश तहसिलदारांकडे सुपुर्द केला असुन लिलाधर दत्तात्रय गोवेकर याच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातुन कौतुक होतो आहे.
कणकवलीःकणकवली येथील व्यापारी लिलाधर गोवेकर हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 20 हजाराचा धनादेश तहसिलदार आर.जे.पवार यांच्याकडे सुपुर्द करताना छायाचित्रात दिसत आहेत.