Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवणात उद्या रक्तदान शिबिर...

मालवणात उद्या रक्तदान शिबिर…

एकता मित्रमंडळ, ग्लोबल रक्तदाते समूहाचे आयोजन ; शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे…

मालवण, ता. २० : एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने २१ एप्रिलला सकाळी नऊ ते एक यावेळेत केदार चायनीज व्हॅली भरड मालवम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कोरोना व्हायरस आणि या लॉकडाऊनच्या या बिकट परिस्थितीमध्ये रक्तदान व मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर होत नसल्याने त्याचा परिणाम रक्तपेढींमध्ये रक्तसाठ्याची टंचाई भासत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. ओरोस रक्तपेढीच्या मागणीची दखल घेत हे शिबिर घेण्यात येत आहे.
अपघातग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, थॅलेसिमिया रुग्ण, कर्करोग, डायलिसीस, शस्त्रक्रिया यासाठी गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. सद्यःस्थितीत रक्तसाठा अत्यल्प असल्याने रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. रक्तदात्यांनी छोट्या गटात यावे. योग्य ती काळजी घेऊनच रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. ज्या रक्तदात्यांना ये-जा करण्याची सोय नसेल त्यांनी अमेय देसाई-९४०४५३५२७३, नीलेश गवंडी- ९४२१४५६८५७, राजू बिडये-९४२०२६१३३२, आतू फर्नांडिस- ९४०४७५३०३३, गौरव वेर्लेकर- ९४०३०७७४८२, हितेंद्र हिर्लोस्कर- ९७६४१०९७५७, शैलेश मालंडकर- ९४२३०५२१४६, तुषार मेस्त्री- ९४२०८२४४८२, विजय पांचाळ- ८०८२४६१२६३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments