एम.बी.यादव; मान्सूनपूर्व कामांसाठी उपाय योजना,नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन…
बांदा.ता,२०: सावंतवाडी तालुक्यातील काही भागात वीज वितरणच्या मान्सूनपूर्व कामांसाठी मंगळवार दिनांक २१ व बुधवार दिनांक २२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी तथा वीज ग्राहकांनी वीजसंबंधीत महत्वाची कामे दुपानंतर किंवा अगोदर करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे बांदा सहायक अभियंता ए. बी. यादव यांनी केले आहे.
बांदा दशक्रोशीसह तालुक्यातील अन्य भागात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या वीज समस्यांसाठी वीज वितरणने पुढाकार घेऊन अत्यावश्यक त्या ठिकाणी पहिल्यांदा वीज वाहिन्यासंबंधी देखभाल व दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील काही आवश्यक त्या भागात वाहिन्यांच्या देखभालीसाठी वीज पुरवठा खंडित राहणार असल्याचे सहायक अभियंता यादव यांनी सांगितले. नागरिकांसह ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.