चार दुचाकी जप्त; दुचाकीस्वारांसह मास्क न लावणार्यांवर कारवाई…
सावंतवाडी ता.२०: लॉकडाउनच्या काळात संचारबंदीचा आदेश झुगारुन शहरात दुचाकी घेऊन फीरणार्या व मास्क न लावणाऱ्या तब्बल १३० जणांना आज येथिल पोलिसांनी दणका दिला आहे.यात चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.तर अन्य लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.याबाबतची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दिली.
प्रशासनाकडुन शहरात नाहक फीरू नये,असे वारंवार आवाहन करून सुध्दा काही दुचाकीस्वार मजेसाठी फीरताना दिसत आहेत.तर काहीजण मास्क लावणे बंधनकारक असून सुद्धा त्या नियमाचे उल्लंघन करीत आहे.दरम्यान आज शहरात नाक्यानाक्यावर तैनात असलेल्या पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बेधडक कारवाई करण्यात आली.यात अंदाजे सुमारे पंचवीस हजार रुपये दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे.