बागायतदारांचे हजारोंचे नुकसान; कृषी विभागाकडुन घटनेचा पंचनामा…
कणकवली.ता,२०: तालुक्यातील असलदे येथील वेताळाचा माळ येथील काजू आंबा बागायतीला सोमवार दुपारी लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळाली. ऐन काजू-आंब्याच्या हंगामातच अचानक आग लागल्याने येथील शेतक-यांनावर संकट ओढावले असून मोठ्या प्रमाणात बायागतदारांचे नुकसान झाले आहे.सध्या कोरोनाचे संकट जगावर असल्याने शेतक-याचे चांगलेच नुकसान झाले आहे.
यात कोकणातील आंबा व काजुला भाव मिळत नसल्याने तेही आर्थिक संकटात सापडले आहेत. यातच असलदे येथील वेताळाचा माळ येथे लागलेल्या आगीत येथील शेतकरी व बागायतदार श्री. दत्तात्रय गंगाराम तांबे,श्री. आत्माराम घाडीगांवकर,श्री. सुनील भागोजी तांबे,श्री. अनंत तांबे, श्री. बळीराम तांबे यांच्या मालकीची ५०० हुन अधिक काजू आणि १० आंबा झाडे जळून झाली खाक झाली असून ऐन काजु व आंब्याच्या हंगामात लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. सध्या काजु व आंबा दर नसतानाही बागा जळल्याने लाखो रुपयांचे आर्थिक संकट या शेतक-यांवर ओढावले आहे. यावेळी कृषी सहाय्यक हेमंत बुधावळे, कोतवाल मिलिंद तांबे, सरपंच गुरूप्रसाद उर्फ पंढरीनाथ याच्यासह आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.