विशाल बोर्डेकर;शिवप्रेमी संघटनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
दोडामार्ग.ता,२०: संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवुन सावंतवाडीत बेकायदा जमाव करणाऱ्या “त्या” समाज विघातक प्रवृत्ती वर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने विशाल बोर्डेकर यांनी केली आहे.
याबाबत प्रशासकीय यंत्रणांना निवेदन देण्यात आले आहे.यात असे म्हटले आहे,की १६ एप्रिल रोजी कोलगाव कोकण कॉलनी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.एक जिल्ह्यातील सुज्ञ नागरिक म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.आक्षेपार्ह मजकुराचे आम्ही समर्थन करत नाही.परंतु जमावबंदी असताना बेकायदा जमाव जमून कायदा हातात घेणे, हे अत्यंत चुकीचे आहे,अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.आमचा पोलिस व न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या त्या युवकावर कारवाई व्हावी परंतु ज्यांनी बेकायदा जमाव करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोपा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.अशा वर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.